Wednesday, March 17, 2010

चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू

चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू

पिक आलंया जोमात औंदा त्येच्यात तणं लागलं वाढू ...
अहो राया चला जोडीनं तण हे काढू ||धृ||

अहो सजणा चला जोडीनं तण हे काढू
अहो सख्या चला जोडीनं तण हे काढू
अहो धनी चला जोडीनं तण हे काढू
अहो दिलवरा जोडीनं तण हे काढू

बांधानं या येता जाता काटं बोचत्यात पायी /* (बांधावर असणारे चुबूक काटे हे सुद्धा एका तणाचाच प्रकार आहे.) */
काढून काढून मी गं थकले उपाय गावंना काही
काट्याकुट्यात कशाला फिरता?...
अहो काट्याकुट्यात कशाला फिरता?
काटं लागल्यात वाढू ||१||

तर मंग राया चला जोडीनं तण हे काढू ||धृ||
अहो सजणा चला जोडीनं तण हे काढू
अहो सख्या चला जोडीनं तण हे काढू

कोरस :
अहो दाजी जावा जोडीनं तण ते काढा...
अहो पाव्हनं जावा जोडीनं तण ते काढा...


विहीर आपली पाण्याची तिचं पाणी लई खोल
पंप विजेचा भक्कम दांडगा आनतोय त्याला वर
पर भारनियमानं वाट लागली...
पर भारनियमानं वाट लागली
हातची पिकं जातील मरू ||२||

अहो राया चला ठिबकसिंचन करू ||धृ||
अहो सजणा चला ठिबकसिंचन करू
अहो सख्या चला ठिबकसिंचन करू
अहो दिलवरा जोडीनं ठिबकसिंचन करू

कोरस :
अहो दाजी जावा जोडीनं ठिबकसिंचन करा...
अहो पाव्हनं आता जोडीनं ठिबकसिंचन करा...


तण सारं साफ झाल्यावर दिसू लागलं दाणं
भरलेलं कणसं खाय येतील जनावरं ही बेणं
पाखरं हाकलाया तुमी ओ आता...
पाखरं हाकलाया तुमी ओ आता
झाडावरती चढा ||३||

अन राया आता तण हे काढून टाका ||धृ||
अहो सजणा जावा तण हे काढून टाका
अहो सख्या तुमी तण हे काढून टाका

कोरस :
अहो दाजी जावा तण हे काढून टाका...
अहो पाव्हनं आता तण हे काढून टाका...


०९/०३/२०१०
पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
(आगामी आकर्षण : पोवाडा मर्द मावळ्याचा)

No comments: